
रवींद्रनाथ टागोर हे रंगाने काळे होते म्हणून त्यांची आई त्यांना जवळ घेत नसत असा दावा केंद्रीय मंत्री सुभाष सरकार यांनी केला आहे. त्यांच्या या विधानामुळे एक नवा वाद निर्माण झाला आहे.
पश्चिम बंगालमध्ये विश्वभारती विद्यापीठात एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तेव्हा केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री सुभाष सरकार म्हणाले की, रवींद्रनाथ टागोर आपल्या परिवारातील इतर सदस्यांच्या तुलनेत जरा काळे होते आणि इतर सदस्य गोरे होते. म्हणून टागोर यांची आई आणि इतर लोक त्यांना जवळ घेत नसत असे सरकार म्हणाले.
It’s 2021, but we are still talking SKIN TONES!
Dr. Subhash Sarkar, MoS Education: Tagore’s skin tone was dark, that’s why his mother didn’t cradle him. Yet he conquered the world. pic.twitter.com/YmynsRdkaH
— Sreyashi Dey (@SreyashiDey) August 19, 2021
तसेच गोऱ्य़ा रंगाच्या त्वचेचे दोन प्रकार असतात. एक थोडी पिवळ्या रंगाची असते तर दुसरी लाल. टागोर यांची त्वचा लाल रंगाची होती, म्हणून त्यांची आई त्यांना जवळ घेत नसत. असे असले तरी टागोरांनी संपूर्ण जग जिंकले होते असेही सरकार यांनी नमूद केले.
सुप्रसिद्ध बंगाली कवी आणि गीतकार श्रीजातो बंडोपाध्याय म्हणाले की टागोर आणि त्यांच्या आईबद्दल मी असे काही वाचले नाही. तसेच टागोर काळे होते याबद्दल कोणी लिहिले नाही अथवा कोणी चर्चाही ऐकली नसल्याचे त्यांनी सांगितले.
तर तृणमूल काँग्रेसने या प्रकरणी सुभाष सरकार यांच्यावर टीका केली आहे. तृणमूलचे नेते अनुब्रत मंडल म्हणाले की सुभाष सरकार हे टागोर यांना बदनाम करत आहेत. सुभाष सरकार यांना हे सगळं कसे कय माहित? ते काय टागोर यांच्या आधी जन्माला आले होते का असा सवालही त्यांनी विचारला आहे.





























































