‘राधे’चा ओटीटीवर नवा विक्रम पहिल्याच दिवशी 4.2 मिलियन व्ह्यूज

अभिनेता सलमान खानच्या ईदला प्रदर्शित झालेल्या ‘राधे’ या चित्रपटाने ओटीटी प्लॅटफॉर्मवर नवा विक्रम रचला आहे. ‘राधे’ने डिजिटल रिलीजच्या पहिल्याच दिवशी 4.2 मिलियन व्ह्यूज मिळवत तो झी-5वर सर्वाधिक बघितला गेलेला चित्रपट ठरला आहे.

ओटीटी आणि डीटीएच प्लॅटफॉर्मवर ‘पे पर ह्यू’ सेवे अंतर्गत हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. मिळालेल्या यशाबद्दल सलमानने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून चाहत्यांचे आभार मानले आहेत. यापूर्वी डिज्नी प्लस हॉटस्टारवर आलेल्या अक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी’ या चित्रपटाला सर्वाधिक व्ह्यूज मिळाले होते.

आयएमडीबीवर प्रेक्षकांनी केली धुलाई

ओटीटीवर चांगले यश मिळाले असले तरी प्रेक्षकांच्या निगेटिव्ह कमेंटमुळे आयएमडीबीवर राधेला दहापैकी केवळ 2.4 स्टार एवढेच रेटिंग मिळवता आले आहे. ‘रेस 3’ नंतर सर्वात कमी रेटिंग मिळवणारा ‘राधे’ हा दुसरा चित्रपट ठरला आहे. आयएमडीबी हा ऑनलाईन डेटाबेस प्लॅटफॉर्म असून प्रेक्षक कलाकृतीचा दर्जा ठरवू शकतात. येथे दहा स्टार हे सर्वाधिक रेटिंग आहे.

आपली प्रतिक्रिया द्या