
सामना ऑनलाईन, कोच्ची
काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी गोव्याचे मुख्यमंत्री आणि माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान पर्रिकरांनी आपल्याला राफेल सौद्याशी आपला काहीही संबंध नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनिल अंबानी यांना फायदा व्हावा यासाठी सगळं जुळवून आणल्याचे पर्रिकरांनी आपल्याला सांगितल्याचं राहुल गांधी यांचं म्हणणं आहे.
या भेटीसाठी राहुल गांधी जेव्हा पोहोचले तेव्हाची दृश्ये पाहण्यासाठी इथे क्लिक करा
Congress President Rahul Gandhi in Kochi, Kerala earlier today: Friends, the ex-defence minister Mr Parrikar clearly stated that he has nothing to do with the new deal that was orchestrated by Mr Narendra Modi to benefit Anil Ambani. pic.twitter.com/QSaVIokt0j
— ANI (@ANI) January 29, 2019
गोव्यामध्ये सुट्टीसाठी आलेल्या राहुल गांधी यांनी मंगळवारी पर्रिकरांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी त्यांची भेट घेतली होती. भेटीनंतर आपल्याला वेळ नसल्याचं सांगत त्यांनी पत्रकारांशी बोलणं टाळलं होतं. मात्र कोच्ची इथल्या जाहीर सभेमध्ये त्यांनी पर्रिकरांसोबत झालेल्या संभाषणाबाबत त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांगितले. यावेळी त्यांनी दावा केला की ‘पर्रिकरांनी या सौद्याशी आपला काहीही संबंध नसल्याचं मला सांगितलं’.

























































