हवाई दलाच्या ताफ्यात राफेलचा समावेश, पण हिंदुस्थानमध्ये येणार 8 महिन्यांनी

405

हिंदुस्थानने फ्रान्सकडून 36 राफेल लढाऊ विमाने खरेदी केली असून मंगळवारी संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्या उपस्थित त्यातील एक विमान हिंदुस्थानच्या सुपूर्द करण्यात आले. मात्र प्रत्यक्षात राफेल विमाने वायूदलाच्या ताफ्यात यायला 8 महिन्यांचा अवधी लागणार आहे. काऱण सध्या वायुदलाच्या जवानांना राफेल संदर्भात प्रशिक्षण दिले जात असून ते पूर्ण होण्यास 8 महिन्यांचा अवधी आहे.

संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी मंगळवारी शस्त्रपुजा करत दसॉल्ट कंपनीकडून पहिले राफेल घेतले. असे असले तरी ते विमान फ्रान्समध्येच राहणार असून जवानांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतरच 36 राफेल विमाने हिंदुस्थानमध्ये आणली जाणार आहेत. या 36 पैकी 4 विमानांचा पहिला ताफा पुढील वर्षी 2020 मे या महिन्यात हिंदुस्थानात आणला जाणार आहे.  मात्र या विमानांचा प्रत्यक्ष वापर करण्यासही वेळ लागणार आहे. त्यानंतर फेब्रुवारी 2021 मध्ये त्यांचा समावेश वायुदलाच्या ताफ्यात केला जाणार आहे.

वायुदलाला 36 राफेल मिळणार आहेत. 2022 पर्यंत ही विमान हिंदु्स्थानाला मिळणं अपेक्षित असून करारानुसार दसॉल्टला 2022 सप्टेंबर ही डेडलाईन देण्यात आली आहे. हिंदुस्थानच्या हवाईदलाच्या ताफ्यात राफेलचा समावेश झाल्याने हवाईदल अधिक सशक्त झाले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या