
फ्रेंच बनावटीच्या राफेल लढाऊ विमानाच्या सागरी आवृत्तीची गोव्यातील किनारा आधारित सुविधेवर यशस्वीपणे उड्डाण चाचणी करण्यात आली आहे.‘राफेल-एम’ लढाऊ विमान अमेरिकानिर्मित सुपर हॉर्नेट विमानाच्या विरोधात चाचणी घेतली जात आहे. या दोन्ही विमानांची अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात सध्या विविध चाचणी सुरू असलेल्या 44,000 टन वजनाच्या आयएमएस विक्रांत नौकेवर तैनातीसाठी हिंदुस्थानच्या नौदलाकडून संभाव्य खरेदीसाठी मूल्यांकन केले जात आहे. विक्रांत नौका बंगालमध्ये ऑगस्ट महिन्यात नौदलात समाविष्ट होण्याची शक्यता आहे.
हिंदुस्थानातील फ्रेंच राजदूत इमॅन्युएल लेनन यांनी मंगळवारी पत्रकारांना सांगितले की, ‘हिंदुस्थानच्या वाहक विमानाच्या डेकवरून राफेल (मरीन) विमानाची टेक-ऑफ (क्षमता) तपासण्यासाठी चाचण्या घेण्यात आल्या. हिंदुस्थानच्या नवीन विमानवाहू जहाजाची रचना स्की-जम्प लाँच शिप म्हणून केली गेली आहे, जे इतर अनेक विमानवाहक जहाजांपेक्षा वेगळे आहे. या जहाजावर जेट विमानासाठी पॅटपल्ट प्रक्षेपण वापरतात. त्यामुळे नौदलाने निवडलेली विमाने सर्व शस्त्रास्त्र आणि संपूर्ण इंधनभार वाहून नेण्यास सक्षम असणे आवश्यक आहे. स्की-जम्प रॅम्पमध्ये नौदल तज्ञ ज्याला शॉर्ट टेक-ऑफ म्हणतात.
‘राफेल-एम’ जेटची गेल्या महिन्यात 12 दिवस गोव्यातील आयएनएस हंसा सुविधेवर 283 मीटर मॉक स्की-जम्प सुविधा वापरून चाचणी घेण्यात आली होती, असे लेनन म्हणाले. बोइंगचे सुपर हॉर्नेट किंवा एफ ए -18 जेट विमानाच्या पुढील महिन्यात आयएनएस हंसा येथे अशाच प्रकारच्या चाचण्या घेणे अपेक्षित आहे. पुरवठादारांनी राफेल-एम आणि सुपर हॉर्नेट विमानामध्ये बदल करून ते हिंदुस्थानी ऑर्डरसाठी योग्य बनवले आहेत, असे संरक्षण सूत्रांनी सांगितले. अण्वस्त्रांचा भार, हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्रे आणि अचूक दिशानिर्देशित बॉम्ब वितरित करण्यास सक्षम असलेल्या विमानाच्या शोधात हिंदुस्थानी नौदल होते, असे सूत्रांनी सांगितले.
राजदूत लेनन यांनी निदर्शनास आणून दिले की, भारतीय हवाई दल आधीच राफेल लढाऊ विमाने वापरत आहे आणि ‘विमानाबद्दल खूप समाधानी आहे.’ आयएएफकडे राफेल जेट असल्याने नौदल ऑर्डर समानतेवर आधारित असेल, असे ते म्हणाले. ‘आम्ही शेवटच्या ऑर्डरमध्ये आधीच 35 राफेल पुरवली आहेत आणि एप्रिलच्या अंतिम मुदतीपूर्वी 36 राफेल विमाने पाठवून ऑर्डर पूर्ण करू,’ असे ते म्हणाले. हिंदुस्थानने 2016 मध्ये फ्रान्सच्या डसॉल्टकडे राफेल जेट्स विमानाची ऑर्डर दिली होती. नौदलाला सुरुवातीला 26 जेट विमाने त्याच्या विमानवाहू जहाजासाठी खरेदी करायची आहेत.


























































