रघुराम राजन यांना यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा राष्ट्रीय पुरस्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
raghuram-rajan

सामना प्रतिनिधी । मुंबई

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा 2018 सालचा राष्ट्रीय पुरस्कार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांना जाहीर झाला आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या 106 व्या जयंतीनिमित्ताने प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली येत्या 12 मार्च रोजी आयोजित सोहळ्यात पुरस्काराचे वितरण होईल. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह, नरीमन पॉइंट येथे सायंकाळी 5 वाजता सोहळा रंगेल. यावेळी रघुराम राजन आपले विचार मांडतील.