माजी केंद्रीयमंत्री रघुवंश प्रसाद सिंह यांचे निधन

माजी केंद्रीयमंत्री रघुवंश प्रसाद सिंह यांचे रविवारी दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना श्वास घेण्यासाठी त्रास होत होता. एम्समधील अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते. दोन दिवसांपुर्वी त्यांची प्रकृती ढासळली होती. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. रविवारी सकाळी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात दुःख व्यक्त होत आहे. बिहारमधील दिग्गज नेत्यांमध्ये रघुवंश प्रसाद सिंह यांचा समावेश होत होता.

 

आपली प्रतिक्रिया द्या