राही.. रखुमाई..

4034

मंजुश्री गोखले

२८ युगांपासून आपले परब्रह्म विटेवर उभे आहे आणि त्याच्या भक्तीत… प्रीतीत रममाण होऊन उभ्या आहेत राही… रखुमाई..

पंढरपूरचा विठ्ठल! महाराष्ट्राचे कुलदैवत, वारकयांचा लाडका विठू,पांडुरंग,विठ्ठल, विठुराया, याला नाव तरी किती? अशी अनंत नावे धारण करणारा हा विठ्ठल प्राचीन युगापासून ते आजच्या टेक्नो सेव्ही युगापर्यंत एक चमत्कार आहे.  जगातील कुठलीच लोकशाही इतके वर्ष सुखाने नांदत नाही. पण पंढरपुरात असलेले अध्यात्मिक लोकशाहीचे हे राज्य जवळपास हजार वर्षे झाली सुखात नांदत आहे. कारण प्रेम भक्ती ज्ञान आणि मानवता या चार स्तंभांवर ही लोकशाही टिकून आहे. जगाच्या पाठीवर कुठेहीअसा भक्तीचा थाट नाही. पंढरपूर हे भूलोकीचे वैकुंठ आहे.आणि इथली लोक देवता आहे विठ्ठल. जगात कुठल्याच दैवताला लाभली नसेल अशी अमाप लोकप्रियता विठ्ठलाला लाभली आहे. आणि त्यासोबत त्याला लाभल्या आहेत अनेक कथा आणि दंतकथा. मुळात विठ्ठल हे श्रीकृष्णाचेअर्वाचिन रुप मानले जाते. नव्हे, विठ्ठलाची भक्ती करणाया आणि आणि अक्षर वाङमय लिहणाया सर्व संतांनी आपल्या वाङ्मयात हे लिहून ठेवलं आहे. आणि एकदा विठ्ठल हा श्रीकृष्णाचा अवतार आहे हे मान्य झाल्यावर, सहाजिकच श्रीकृष्ण रूपातल्या अनेक कथा विठ्ठलाशी निगडीत केल्या जाणं स्वाभाविक आहे. पंढरपूरला श्रीविठ्ठलाच्या मूर्तीपासून रुक्मिणीची मूर्ती बाजूला आहे. पण विठ्ठल भक्तांच्या मताप्रमाणे मंदिरात असलेली रुक्मिणीची मूर्ती ही खरी रुक्मिणी नाहीच. खरी रुक्मिणी मंदिरापासून लांब अंतरावर असलेल्या दिंडीर बनात आहे.  ही रुक्मिणी म्हणजे श्रीकृष्णावतारातली त्याची पत्नी रुक्मिणी. भीमक राजाची कन्या रुकमीची बहीण. पण गेली अनेक वर्षे विठ्ठलाची संत नामदेव रचित जी आरती म्हटली जाते ती ठयुगे अठ्ठावीस विटेवरी उभा ठया आरतीमध्ये रखुमाई वल्लभा,राहीच्या वल्लभा असे शब्द आहेत. आणखीही बरेच ठिकाणी संत नामदेवांनी ठराही रखुमाबाई ठ असे म्हटले आहे.

आता यातली रुख्माबाई म्हणजे श्रीकृष्णाची पत्नी आणि श्रीकृष्णाच्या विठ्ठल अवतारातील पत्नी रुक्मिणी हे सर्वज्ञात आहे पण यातील राही म्हणजे कोण तर राही म्हणजे राधा. श्री कृष्णाची राधा-राधा-,राधी-राही.  राधा या शब्दाचा अपभ्रंश राही. आता या विठ्ठल अवतारात ही राधा कुठून आली. ?तर त्याची एक कथा अशी की श्रीकृष्णाचे राधा वरचे प्रेम हे सर्वश्रूत आहे. राधा एक विवाहिता, तिचा पती अनय पण ती श्रीकृष्णाची भक्त आणि प्रियतमा. श्रीकृष्णाचे राधे वरचे प्रेम बघून तिच्या बद्दल रुक्मिणीला मत्सर वाटत असे. एकदा राधेला श्री कृष्णाच्या मांडीवर बसलेली बघून रुक्मिणी संतापली आणि रागावून दिंडीर बनात तपःश्चर्येला आली. वारकरी ही कथा मानत नाहीत.दिंडीर बन हा तिंडीर शब्दाचा अपभ्रंश तिंडीरबन म्हणजे चिंचेचे बनआणि आजही तिथे चिंचेची झाडे आहेत,तर रुक्मिणी तिथे येऊन बसली. तिच्या पाठोपाठ श्रीकृष्णही तिचा रुसवा काढण्यासाठी गोप वेशामध्ये गायी गुरांसह तेथे आला. राधेला आवडणारा तो पोषाख बघून रुक्मिणी आणखीच चिडली. तीने श्रीकृष्णाला तेथून निघून जायला सांगितल. नाईलाजाने श्रीकृष्ण तेथून परत फिरला.

पुंडलिकाने त्याला अडवले. पुंडलिकाला ही वार्ता सांगावी म्हणून श्रीकृष्णाने पुंडलिकाला हाक मारली. पण पुंडरलीक आई वडिलांच्या सेवेमध्ये गुंतला होता म्हणून पुंडलिकाने श्रीकृष्णाला उभे राहण्यासाठी वीट फेकली.आणि श्रीकृष्णाला त्यावरती उभे राहण्यास सांगितले. पुंडलिका ची वाट बघत कमरेवर हात ठेवून श्रीकृष्णा तिथे उभा राहिला तोच हा विठ्ठल. विट – ठल-विठ्ठल. विटेवर ठेला म्हणजे उभा राहिला तो विठ्ठल. वारकरी संप्रदाय राधाकृष्णाची ही कथा मानत नाही. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे श्रीकृष्णाचे प्रेम आपल्यापेक्षा सत्यभामेवर जास्त आहे.आणि या प्रेमाचे प्रतीक म्हणून श्री श्रीकृष्णांनी तिला स्वर्गातला पारिजातक आणून दिला.या कारणाने सवती मत्सर वाटून रुक्मिणी चिडली आणि रुसून दिंडिर बनात जाऊन बसली. तिचा रुसवा काढण्यासाठी श्रीकृष्ण पंढरपुरात आला. अर्थात या कथेशी राधेचा म्हणजेच राहीचा संबंध नाही.पण तरीही विठ्ठल म्हणजे श्रीकृष्ण आहे आणि श्रीकृष्ण म्हणजे विठ्ठल आहे हे मान्य केल्यावर जिथे जिथे श्रीकृष्ण आहे तिथे तिथे राधा असणार या संकेतांमुळे पंढरपुरात राधेची मूर्ती आली. संतांच्या मांदियाळीत संत नामदेव हे सर्वव्यापी संत म्हणून गौरवले जातात.पंढरपुरातल्या विठ्ठला सोबत सोबत राही आणि रखुमाई या दोघी असत असे उल्लेख अनेक ठिकाणी नामदेवांच्या गाथेत येतात । यांचे काही उदाहरणे देता येतील- ‘सत्यभामा राही रुक्माई जननी (९२९)’ ,’राही रुक्माई परवडी वाढितसे (९३०)’ ,’जीवींचे गुज राही रुक्माई पुसे (९४५)’.,’ विडा देती राही उभी उजव्या बाही (९४३)’. संत नामदेवांच्या गाथेत असे अनेक ठिकाणी राहीचा उल्लेख आला आहे.

अर्थात तो श्री कृष्णासोबत राधा या श्रद्धेपोटी आहे हे निश्चित. पण पंढरपुरात आलेल्या विठ्ठल रूपातल्या श्री कृष्णासोबत राधा राही तिथे आली ही विठ्ठल भक्तांची श्रद्धा राधाकृष्णाच्या चिरंतरन प्रेमाचे एक गोमटे रूप आहे हे खरे. एक दंतकथा अशीही सांगतात की या सगळ्या प्रवासात राधा म्हणजे राही श्रीकृष्णाच्या सोबत अदृश्य स्वरूपात होती. कारण सर्व अवतारात मी तुझ्यासोबत राहीन असे वचन राधेने श्रीकृष्णास दिलेले होते. म्हणूनच विठ्ठला सोबत राही -रखुमाबाई या.दोघींचे नाव येते. अर्थात पंढरपुरात खरंतर राधेचं मंदिर, राधेची मूर्ती असण्याचं तसं कारण नाही .पण राही रखुमाबाई या भावनेच्या श्रद्धेची आणि भक्तांच्या भावनेची बूज राखण्यासाठी राधेच मंदिर उभारण्यात आले. रुक्मिणीचे खरे मंदिर दिंडीर बनात आहे. आणि राधेचे मंदिर विठ्ठल मंदिरातल्या रुक्मिणी मंदिरात आहे. राधेचं म्हणजे राहीचे श्रीकृष्णा सोबत असणं ही श्रद्धा इथे जोपासली जाते. राधेने श्रीकृष्णाला सोबतीचे वचन देताना मी राई रूपात तुझ्यासोबत राहीन असे सांगितले होते,अशी एक कथा आहे. यात राई म्हणजे दगडाचा चुरा. म्हणजे वाळूचे कण. याच भावनेने चंद्रभागेचे वाळवंटही पवित्र मानले जाते. तर राही रखुमाबाई यांची ही कथा. त्यांचा एकमेकींशी परात्पर संबंध आहे कारण त्या दोघींचा विठ्ठलाशी म्हणजेच श्रीकृष्णाशी संबंध आहे. अनेक तथा दंतकथांचा निमित्त असलेला हा विठ्ठल आणि त्यांच्यासोबत असलेल्या राही रखुमाई या किती प्राचीन आहेत याचा अचूक पुरावा नसला तरी आद्य शंकराचार्यांच्या पांडुरंगाष्टकम् मध्ये महायोगपीठे तटे भीमरथ्यां पुंडरीकाय दातुं मुनींन्दैःसमागत्य तिष्टंतमानन्दकंद, परब्रह्मलिंग भजे पांडुरंगम्।। या स्रोत्रातपांडुरंगाचे म्हणजे विठठ्लाचे आणि पंढरपुरचे वर्णन आहे.आद्य शंकराचार्यांचा काल जर आठवे शतक मानला तर बाराशेवर्षापूर्वीपासून तरी विठठ्ल आणि पंढरपुर यांचे अस्तित्व होते आणित्याच्या सोबत राही-रखुमाईचेही.

 

आपली प्रतिक्रिया द्या