जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना डॉ.एस.एस.गडकरी पुरस्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रशासकीय सेवेत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून लोकहितार्थ कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांना भारतीय लोक प्रशासन संस्थेच्या वतीने माजी सनदी अधिकारी डॉ.एस. एस. गडकरी यांच्या नावे पुरस्कार प्रदान करण्यात येतो. या पुरस्काराचे हे चौथे वर्ष असून, यंदाचा हा पुरस्कार नगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना महाराष्ट्र विभागीय शाखेचे अध्यक्ष स्वाधीन क्षत्रिय यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

शुक्रवारी मंत्रालयात भारतीय लोक प्रशासन संस्थेच्या महाराष्ट्र विभागीय शाखेच्या 64 व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सनदी अधिकारी राहुल द्विवेदी यांना नाविन्यपूर्ण कार्यासाठी पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. शाल, श्रीफळ, मानचिन्ह आणि 10 हजार रूपये रोख असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. यावेळी खुल्या निबंध स्पर्धेतील विजेत्यांचाही सत्कार करण्यात आला.