भाजपने महाराष्ट्रात निवडणुका चोरल्या, मात्र आम्ही त्यांना बिहारमध्ये निवडणुका चोरू देणार नाही – राहुल गांधी

भाजपने महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये लोकसभेत निवडणुका चोरल्या. मात्र आम्ही बिहार निवडणुका चोरू देणार नाही, असं लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले आहेत. राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वात सुरु असलेली मतदार हक्क यात्रा आज बिहारमधील आरा येथे पोहोचली. या यात्रेत आज समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादवही सहभागी झाले होते. याचवेळी जनतेशी संवाद साधताना राहुल गांधी असं म्हणाले आहेत.

राहुल गांधी म्हणाले की, “आरएसएस-भाजपला गरिबांचा आवाज ऐकू येऊ नये, असं वाटतं. पण गरिबांचा आवाज देशभर घुमेल. त्यांनी महाराष्ट्र, हरियाणात लोकसभा निवडणुकीत मते चोरली, पण आम्ही त्यांना बिहारमध्ये मते चोरू देणार नाही.”

यावेळी बोलताना अखिलेश यादव म्हणाले की, “बिहारच्या लोकांना कळेल की भाजपचा रथ येथे आधीही थांबवण्यात आला आहे. यावेळीही येथील लोक त्यांचा रथ थांबवतील.”