
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी जर्मनीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. एवढच नाही तर पंतप्रधान मोदींचं थेट नाव न घेता इसिसची भिती वर्तवली आहे. मात्र काँग्रेसचा हा हल्ला भाजपने परतावून लावला आहे.
I had a conversation with Ex-Defence Secretary Robert McNamara about his experiences in the Vietnam War. He said, we spoke to a lot of Vietnamese generals, but never listened to them: Congress President @RahulGandhi #WillkommenRahulGandhi pic.twitter.com/dmx4GpmVlB
— Congress (@INCIndia) August 23, 2018
जर्मनीतील हॅम्बर्ग येथील बूसेरियस समर स्कूलच्या विद्यार्थ्यांना संबोधित करताना त्यांनी मोदी सरकारच्या नोटाबंदी आणि जीएसटीच्या निर्णयांवर टीका केली. या निर्णयांमुळे छोटे व्यापारी, असंघटीत कामगार यांच्यावर मोठं संकट कोसळलं, अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या असं राहुल गांधी म्हणाले. देशाच्या अर्थव्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याचेही राहुल गांधी म्हणाले.
तसेच २१ व्या शतकात जर तुम्ही कोणाला योग्य संधी दिली नाही किंवा व्हिजन दिलं नाही तर दुसरीकडून त्याला व्हिजन मिळेल. हे बोलताना त्यांनी इसिसचं उदाहरण दिलं. ते म्हणाले की, अमेरिकेने जेव्हा कायद्याच्या आधारावर इराकच्या एका समाजाला सरकारी नोकरीतून काढून टाकलं, तेव्हा त्यांनी दहशतवादी संघटना (इसिस) उभी केली. अशाच धोरणांमुळे आज इराक आणि सिरियात गंभीर स्थिती निर्माण झाली आहे.
Horrified to hear Congress President RahulG justifying the formation of ISIS in Syria ..and giving out a veiled threat that if Modiji doesn’t “give vision” to India then soon someone else(read ISIS) would give the vision..Unbelievable ..He’s a PM aspirant??
— Sambit Patra (@sambitswaraj) August 22, 2018
राहुल गांधी यांच्या या भाषणाला भाजपकडून ट्विटरवरून तात्काळ उत्तर देण्यात आलं आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी इसिसच्या निर्मितीचं उदाहरण देताना दिलेले कारण भयंकर आहे आणि मोदींनी जर हिंदुस्थानला व्हिजन दिले नाही तर दुसरे कोणीतरी (म्हणजे इसिस) व्हिजन देईल असं म्हटलं आहे. हे अविश्वनियच आहे.. हे खरंच पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत का?, असं म्हणत भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी राहुल गांधींवर पलटवार केला आहे.
summary: rahul gandhi attacks modi government. threat isis like situation. bjp replied.

























































