
आसामचे मुख्यमंत्री हे देशातील सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री, त्यांना तुरुंगात पाठवू, असं लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले आहेत. राहुल गांधी हे आसाम दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पक्षाच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांना संबोधित करताना आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांना लक्ष्य केलं आहे.
यावेळी बोलताना राहुल गांधी म्हणाले, “आसामचे मुख्यमंत्री स्वतःला राजा समजतात, पण ते फार काळ सत्तेत राहणार नाहीत. ते तुरुंगात जाणार, काँग्रेसला हवे म्हणून नाही तर, आसामचे लोक त्याला भ्रष्टाचारासाठी तिथे पाठवतील म्हणून.”
राहुल गांधी यांनी 2026 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष विजयी होईल, असा विश्वास व्यक्त केला. त्यांनी आसाममधील काँग्रेसच्या नव्या नेतृत्वाचे कौतुक करत जनतेच्या पाठिंब्यावर विश्वास दर्शवला. त्यांनी सरमा यांना हिंदुस्थानातील सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री संबोधले आणि भाजपवर मतदार यादीत फेरफार केल्याचा आरोप केला. “भाजप आणि निवडणूक आयोग एकत्र काम करत आहेत. महाराष्ट्रात त्यांनी निवडणूक चोरली आणि आता बिहारातही तेच करायचा प्रयत्न करत आहेत,” राहुल असे गांधी यांनी यावेळी म्हणाले आहेत.