
भाजपने केलेल्या मतचोरीचा जगभरात डंका वाजत असताना काँग्रेस नेते तथा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुजरातेतील दहा अज्ञात राजकीय पक्षांना मिळालेल्या ४३०० कोटी रुपयांच्या देणगीचा नवीन बॉम्बगोळा टाकला आहे. या पक्षांना देणगी मिळाली ४३०० कोटी रुपये, पण निवडणूक आयोगाला खर्च दाखवण्यात आला आहे केवळ ३९ लाख रुपये! तर हाच खर्च लेखा परीक्षणात ३५०० कोटी रुपये दाखवण्यात आला आहे. मतचोरीवर शपथपत्र मागणारा निवडणूक आयोग आता या देणगीचोरी-वरही शपथपत्र मागणार का, असा खोचक सवालही राहुल गांधी यांनी केला आहे.
लोकसभा आणि महाराष्ट्र, हरियाणातील विधानसभा निवडणुकीत झालेल्या मतचोरीवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुरा-व्यानिशी निवडणूक आयोगाचे वस्त्रहरण केले. राहुल गांधी यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्याऐवजी निवडणूक आयोगाने त्यांच्याकडे सत्य कथन करत असल्याचे शपथपत्र मागितले. सर्वोच्च न्यायालयाने बिहारमध्ये मतदारांची वगळलेली ६५ लाख नावे जाहीर करण्याचे आदेश देऊन निवडणूक आयोगाचे थोबाड फोडले. सध्या बिहारमध्ये व्होटर अधिकार यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी दररोज निवडणूक आयोगाच्या कारभाराची लक्तरे वेशीला टांगत आहेत.
गुजरातेतील नोंदणीकृत दहा राजकीय पक्षांना मिळालेल्या अवाढव्य देणगीबद्दल राहुल गांधी यांनी धक्कादायक गौप्यस्फोट केला. २०१९ ते २०२४ या कालावधीत या राजकीय पक्षांना तब्बल ४३०० कोटी रुपये देणगी मिळाली. या कालावधीत गुजरातेत तीन निवडणुका झाल्-या. २०१९, २०२४ ची लोकसभा निवडणूक, २०२२ च्या विधानसभा निवडणूकीत या राजकीय पक्षांनी फक्त ४३ उमेदवार निवडणुकीला उभे केले. या सर्व उमेदवारांना मिळून ५४,०६९ मते मिळाली. कहर म्हणजे या सर्व उमेदवारांचा निवडणुकीचा खर्च आहे फक्त ३९ लाख रुपये. पण लेखापरीक्षणात हाच खर्च हजारो पटीने वाढवून तब्बल ३५०० कोटी रुपये एवढा दाखवण्यात आला आहे. निवडणूक आयोगाच्या कागद-पत्रांमधूनच हा खुलासा झाला आहे.
काँगे्रस नेते राहुल गांधी यांनी ‘एक्स’वर या सगळ्या घोटाळ्याचा पर्दाफाश केला आहे. गुजरातेत काही अज्ञात राजकीय पक्षांना ४३०० कोटी रुपये एवढी देणगी मिळाली. या पक्षांनी निवडणुका लढवल्या किती? खर्च केला किती? या राजकीय पक्षांचे गॉडफादर कोण आहेत? हे हजारो कोटी रुपये आले कोठून? असा प्रश्नांचा भडिमारच राहुल गांधी यांनी केला आहे. एवढा पैसा आला आणि गायब झाला. निवडणूक आयोग याचीही चौकशी करणार आहे का, कायदा बदलून पळ काढणार! हा डेटा लपवण्यासाठीही निवडणूक आयोग धडपड करणार का? या राजकीय पक्षांना शपथपत्र मागणार? असा खोचक सवालही राहुल गांधी यांनी केला आहे.
राहुल गांधी यांचा नवीन बॉम्ब
लोकसभा आणि महाराष्ट्र, हरयाणातील विधानसभा निवडणुकीत झालेल्या मतचोरीवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुराव्यानिशी निवडणूक आयोगाचे वस्त्रहरण केले. राहुल गांधी यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्याऐवजी निवडणूक आयोगाने त्यांच्याकडे सत्य कथन करत असल्याचे शपथपत्र मागितले. सर्वोच्च न्यायालयाने बिहारमध्ये मतदारांची वगळलेली ६५ लाख नावे जाहीर करण्याचे आदेश देऊन निवडणूक आयोगाचे थोबाड फोडले. सध्या बिहारमध्ये व्होटर अधिकार यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी दररोज निवडणूक आयोगाच्या कारभाराची लक्तरे वेशीला टांगत आहेत.
गुजरातेतील नोंदणीकृत दहा राजकीय पक्षांना मिळालेल्या अवाढव्य देणगीबद्दल राहुल गांधी यांनी धक्कादायक गौप्यस्फोट केला. २०१९ ते २०२४ या कालावधीत या राजकीय पक्षांना तब्बल ४३०० कोटी रुपये देणगी मिळाली. या कालावधीत गुजरातेत तीन निवडणुका झाल्-या. २०१९, २०२४ ची लोकसभा निवडणूक, २०२२ च्या विधानसभा निवडणूकीत या राजकीय पक्षांनी फक्त ४३ उमेदवार निवडणुकीला उभे केले. या सर्व उमेदवारांना मिळून ५४,०६९ मते मिळाली. कहर म्हणजे या सर्व उमेदवारांचा निवडणुकीचा खर्च आहे फक्त ३९ लाख रुपये. पण लेखापरीक्षणात हाच खर्च हजारो पटीने वाढवून तब्बल ३५०० कोटी रुपये एवढा दाखवण्यात आला आहे. निवडणूक आयोगाच्या कागद-पत्रांमधूनच हा खुलासा झाला आहे. काँगे्रस नेते राहुल गांधी यांनी ‘एक्स’वर या सगळ्या घोटाळ्याचा पर्दाफाश केला आहे. गुजरातेत काही अज्ञात राजकीय पक्षांना ४३०० कोटी रुपये एवढी देणगी मिळाली. या पक्षांनी निवडणुका लढवल्या किती? खर्च केला किती? या राजकीय पक्षांचे गॉडफादर कोण आहेत? हे हजारो कोटी रुपये आले कोठून? असा प्रश्नांचा भडिमारच राहुल गांधी यांनी केला आहे. एवढा पैसा आला आणि गायब झाला.
निवडणूक आयोग याचीही चौकशी करणार आहे का, कायदा बदलून पळ काढणार! हा डेटा लपवण्यासाठीही निवडणूक आयोग धडपड करणार का? या राजकीय पक्षांना शपथपत्र मागणार? असा खोचक सवालही राहुल गांधी यांनी केला आहे.
असा आहे देणग्यांचा गोलमाल…
- लोकशाही सत्ता पार्टीला १०४५ कोटी रुपये देणगी मिळाली असून त्यापैकी १०३१ कोटी रुपये खर्च झाले आहेत. या पक्षाने चार उमेदवार उभे करून ३९९७ मते
मिळवली. या पक्षाचा निवडणुकीतील खर्च आहे २.२७ लाख रुपये. - भारतीय नॅशनल जनता दल या पक्षाला ९६२ कोटीची देणगी मिळाली असून खर्च झाला आहे ९६१ कोटी रुपये. या पक्षाने ८ उमेदवार उभे करून ११,४९६ मते मिळवली. या पक्षाचा निवडणुकीचा खर्च आहे २.८३ लाख रुपये.
- स्वतंत्र अभिव्यक्ती पार्टीला ६६३ कोटी रुपयांची देणगी मिळाली असून त्यापैकी ७३ कोटी खर्च झाले आहेत. या पक्षाने सहा उमेदवार उभे करून ११,६९२ मते मिळवली. या पक्षाचा निवडणुकीतील खर्च आहे १२.१८ लाख रुपये.
- न्यू इंडिया युनायटेड पार्टी या पक्षाला ६०८ कोटी रुपयांची देणगी मिळाली असून त्यापैकी ४०७ कोटी रुपये खर्च झाले आहेत. या पक्षाच्या चार उमेदवारांनी ९०२९ मते मिळवली. या पक्षाचा निवडणुकीचा खर्च आहे १.६१ लाख रुपये.
- सत्यवादी रक्षक पार्टीला ४१६ कोटी रुपयांची देणगी मिळाली असून या पक्षाने पूर्ण ४१६ कोटी रुपये खर्च केले आहेत. दोन उमेदवार उभे करून या पक्षाने १०४२ मते मिळवली. या पक्षाचा निवडणुकीचा खर्च आहे १.४३ लाख रुपये.
- भारतीय जनपरिषद पक्षाला २४९ कोटी रुपयांची देणगी मिळाली असून २४७ कोटी रुपये खर्च झाला आहे. या पक्षाच्या १५ उमेदवारांनी १४,३२४ मते मिळवली. या राजकीय पक्षाचा निवडणुकीतील खर्च आहे १४.५ लाख रुपये.
- सौराष्ट्र जनता पक्षाला २०० कोटी रुपयांची देणगी मिळाली असून त्यापैकी १९९ कोटी रुपये खर्च झाले आहेत. या पक्षाने एक उमेदवार उभा करून १४० मते मिळवली. या पक्षाचा निवडणूक खर्च आहे १.४७ लाख रुपये.
- जन मन पार्टीला १३३ कोटी रुपयांची देणगी मिळाली असून खर्चही तेवढाच १३३ कोटी रुपये झाला आहे. या पक्षाच्या दोन उमेदवारांनी ४८० मते मिळवली. या पक्षाचा निवडणूक खर्च आहे १.३१ लाख रुपये.
- मानवाधिकार नॅशनल पार्टीला १२० कोटी रुपयांची देणगी मिळाली असून या पक्षाचा खर्च शून्य आहे. दोन उमेदवार उभे करून या पक्षाने १८८७ मते मिळवली. या पक्षाचा निवडणूक खर्च ८२ हजार रुपये आहे.
- गरीब कल्याण पार्टीला १३८ कोटी रुपयांची देणगी मिळाली असून या पक्षाचा खर्चही शून्य आहे. तीन उमेदवार उभे करून या पक्षाने ३९७९ मते मिळवली. या पक्षाचा निवडणूक खर्च आहे ३.२७ लाख रुपये.