
देशात कोरोनाचा प्रकोप वाढत आहे. अशातच कोरोनाविषयी धोरणावर कॉंग्रेस पक्ष सातत्याने केंद्र सरकारवर निशाणा साधत आहे. कॉंग्रेस नेते राहुल गांधी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून जवळजवळ दररोज मोदी सरकारवर निशाणा साधत आहेत. राहुल गांधींनी आज पुन्हा ट्विट करुन पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला आहे.
राहुल यांनी ट्विट करत लिहिलं आहे की, ‘नद्यांमध्ये वाहणारे असंख्य मृतदेह, रुग्णालयात लांबच-लांब रांग, जीवन सुरक्षेचा हक्क हिरावून घेतला. पंतप्रधान, ते गुलाबी चष्मे काढा, ज्यातून सेंट्रल विस्टाशिवाय दुसरं काहीच दिसत नाही.’
नदियों में बहते अनगिनत शव
अस्पतालों में लाइनें मीलों तक
जीवन सुरक्षा का छीना हक़!PM, वो गुलाबी चश्में उतारो जिससे सेंट्रल विस्टा के सिवा कुछ दिखता ही नहीं।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 11, 2021
उत्तर प्रदेश-बिहार नद्यांमध्ये आढळत आहे रुग्णांचे मृतदेह
कोरोना संकटात उत्तर प्रदेश, बिहार आणि हरियाणा येथील रुग्णांचे मृतदेह नद्यांमध्ये सापडले आहेत. स्मशानभूमीत रुग्णांच्या अंत्यसंस्कारासाठी जागा नसल्याने अनेक कुटुंबीय मृतदेह नद्यांत सोडत असल्याचे बोलले जात आहे. यावरून राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.
यापूर्वी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या कोरोना लसीकरण धोरणावर प्रश्न उपस्थित केले होते. त्यांनी ट्विट करत लिहिलं होतं की, ‘देशातील निम्म्याहून अधिक लोकसंख्येकडे इंटरनेट सुविधा नाही. अशातच ऑफलाइन बुकिंगची सुविधा देखील उपलब्ध असायला हवी.’





























































