
मतचोरी आणि मतदार याद्यांच्या फेरतपासणीवरून सध्या देशभरात रणसंग्राम सुरू आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी घेतलेल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत मतदार याद्याच्या घोटाळ्याचे पुरावे सादर केले होते. आता पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी दुबार मतदारांची यादीच दाखवली. यामधील सर्वात महत्वाचे उदाहरण म्हणजे, एकाच व्यक्तीने हरयाणात 22 वेळा केलेले मतदार. पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी या व्यक्तीचा फोटो दाखवत त्यांच्या नावाने कुठे आणि किती वेळा मतदान झाले हे उघड केले आणि निवडणूक आयोगाच्या हलगर्जीपणाचा पर्दाफाश केला.
राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेदरम्यान, एका महिलेचा फोटो दाखवत ‘ये कौन है?’ असा सवाल केला. यानंतर त्यांनी या महिलेने हरयाणात केलेल्या मतदानाची पोलखोल केली. या महिलेने निवडणुकांच्या वेळी कधी सीमा, तर कधी स्विटी अशा वेगवेगळ्या नावांनी 22 वेळा मतदान केल्याचे सांगितले. एवढेच नाही तर 10 वेगवेगळ्या बूथवर हे मतदान करण्यात आले आहे. याचप्रमाणे असे अनेक घोटाळे या निवडणुकांदरम्यान करण्यात आल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले.
या ब्राझिलियन मॉडेलने हरयाणात 22 वेळा मतदान केलं, राहुल गांधी यांनी केले एक्स्पोज pic.twitter.com/41Oy3QwKHJ
— Saamana Online (@SaamanaOnline) November 5, 2025
दरम्यान राहुल गांधी यांनी या महिलेची कुंडलीच सगळ्या पत्रकारासमोर मांडली. राहुल गांधी म्हणाले, या महिलेचे नाव मॅथ्युस फेरेरो (Matheus Ferrero) असे असून ती ब्राझीलची मॉडेल आहे. यावेळी राहुल गांधी यांनी तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरील तिचा फोटो दाखवला. हरयाणात निवडणुकीवेळी झालेल्या 25 लाख वोटचोरीतील एक महत्वाचे उदाहरण असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोग (ECI) आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात एकमत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. “मी जे म्हणतोय ते १००% खरे आहे. संपूर्ण राज्याची निवडणूक चोरीला गेली. हरियाणामधील सर्व पोलमध्ये काँग्रेसच्या विजयाचे भाकित करण्यात आले होते, परंतु काँग्रेसचा निश्चित विजय पद्धतशीरपणे पराभवात बदलण्यात आला. मला GenZ ला देखील हेच सांगायचे की बघा कशा पद्धतीने तुमच्या भविष्याची चोरी होत आहे, असेही राहुल गांधी म्हणाले.





























































