
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवरून विरोधकांनी चर्चेची मागणी केली होती. मात्र लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना बोलू न दिल्याने मोठा गदारोळ झाला. त्यानंतर लोकसभा 2 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आली.
लोकसभा स्थगित झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी यांनी त्यांना बोलू देत नसल्याचा आरोप केला. ”संरक्षण मंत्र्यांना बोलायला दिलं जातं. त्यांच्या लोकांना बोलायला दिलं जातं. पण मी विरोधकांना बोलू दिलं जात नाही. मी विरोधी पक्ष नेता आहे. मलाही बोलू दिलं जात नाहीए. आम्हाला दोन शब्द बोलायचे होते माझा हक्क आहे तो पण विरोधी पक्षाला त्याची परवानगीच दिली जात नाही”, असे राहुल गांधी म्हणाले.