नरेंद्र मोदी नरवणेंच्या पुस्तकाला घाबरले! राहुल गांधी यांचा हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मनोज नरवणे यांच्या पुस्तकाला घाबरून लोकसभेत आले नाहीत. ते अजूनही घाबरलेले आहेत. ते सत्याचा सामना करू शकत नाहीत,’ असा हल्ला लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज चढवला.

काँग्रेसच्या महिला खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना लिहिलेल्या पत्राबद्दल विचारले असता राहुल गांधी यांनी हे मत मांडले. ‘काँग्रेसच्या महिला खासदार पंतप्रधानांवर हल्ला करणार होत्या असे म्हणणे हास्यास्पद आहे. मी पंतप्रधानांवर हल्ला करणार असे कोणी म्हणाले असेल तर त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करा. ते तुम्ही का करत नाही, असा सवाल राहुल यांनी सरकारला केला.

मोदींनी हिंमत दाखवायला पाहिजे!

‘पंतप्रधानांच्या भीतीचे खरे कारण वेगळेच आहे. मी जे काही बोलतोय, त्याला ते घाबरले आहेत. हिंदुस्थान-अमेरिकेतील करार कसा झाला, तो कोणत्या परिस्थितीत केला गेला, त्याचे आपल्या शेतकऱयांवर काय परिणाम होणार आहेत याची चर्चा आम्हाला करायची आहे. मोदी लोकसभेत न येण्याचे तेही एक कारण आहे. खरंतर मोदींनी सभागृहात येण्याची हिंमत दाखवायला हवी,’ असे राहुल गांधी म्हणाले.