
ईडी आणि सीबीआय हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातचे बाहुले बनले आहेत. या तपास यंत्रणांच्या माध्यमातून विरोधी पक्षातील नेत्यांवर दबाव टाकला जात आहे, अशा शब्दांत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर तोफ डागली. मोदी हे शेतकऱयांचा, सर्वसामान्यांचा खिसा कापून धनदांडग्यांचे खिसे भरत असल्याचा आरोपही राहुल यांनी केला. भारत जोडो न्याय यात्रा उत्तर प्रदेशच्या रामपूर खास येथे आली, तेव्हा ते बोलत होते.



























































