कोरोना संकटात मोदी सरकारने फक्त `खयाली पुलाव शिजवले’, राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर निशाणा

497

देशात कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. त्यानंतरदेखील केंद्र सरकारकडून कोणतीही ठोस उपाययोजना होताना दिसत नाही. यावरून कॉँग्रेस नेते राहुल गांधी यांनी `कोरोना संकटात मोदी सरकारने फक्त `खयाली पुलाव शिजवले’ अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

हिंदुस्थानात कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल 50 लाखांचा टप्पा पार केला आहे. कोरोनामुळे देशभरात तब्बल 82066 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या पाश्र्वभूमीवर राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींनी कोरोनाकाळात घेतलेले निर्णय आणि सीमेवरील चीनच्या वाढत्या घुसखोरीकडे लक्ष वेधत ट्विटरद्वारे जोरदार टीका केली आहे. कोरोनाच्या संकटात मोदी सरकारने खयाली पुलाव केले. 21 दिवसांमध्ये कोरोनावर मात करू, आरोग्य सेतू अॅप्समुळे संरक्षण होईल, 20 लाख कोटींचे पॅकेज, आत्मनिर्भर व्हा, सीमेवर कोणीही घुसखोरी केली नाही, परिस्थिती नियंत्रणात आहे, अशी यादी त्यांनी शेअर केली. मात्र संकटातील संधी हे एक सत्य होते `पीएम केअर’, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या