एपस्टीनसारख्या गुन्हेगारासोबत नाव जोडले जाणे लाजिरवाणे, राहुल गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक व्हिडीओ पोस्ट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. एपस्टीनसारख्या गुन्हेगारासोबत नाव जोडले जाणे, हे लाजिरवाणे आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.

हिंदुस्थान-अमेरिका व्यापार करार, अदानी प्रकरण आणि एपस्टीन फाइल् करत राहुल गांधी म्हणाले की, “मोदीजी, तुम्ही लाजेबद्दल बोलत आहात? मी तुम्हाला लाजेबद्दल सांगतो. तुमचे नाव, तुमच्या मंत्र्यांचे आणि तुमच्या मित्राचे नाव एपस्टीन फाइल्समध्ये एकत्र येणे, तुमचे नाव एका भयंकर गुन्हेगाराशी जोडले जाणे, हे लज्जास्पद आहे. तुम्ही अमेरिकेशी केलेला व्यापार करार, ज्यामध्ये तुम्ही देश विकला, हे लज्जास्पद आहे.”

राहुल गांधी म्हणाले, “आपल्या देशाचा डेटा दिला. शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केले. कापड उद्योग उद्ध्वस्त केले, ही लाजिरवाणी गोष्ट आहे. संपूर्ण देशाला माहित आहे की अमेरिकेत अदानीविरुद्धचा खटला तुमची झोप उडवत आहे. कारण हा भाजप आणि तुमच्या आर्थिक व्यवस्थेविरुद्धचा खटला आहे. या प्रकरणात १४ महिन्यांपासून कोणतीही कारवाई झालेली नाही, ही लाजिरवाणी गोष्ट आहे. मोदीजी, तुमचे मित्र अनिल अंबानी, अदानी आणि स्वतःसाठी जे योग्य वाटेल ते करा. मी आणि काँग्रेस पक्षाचे शूर सिंह देशाचे रक्षण करत राहू, आम्ही एक इंचही मागे हटणार नाही.”