राष्ट्रवादीला धक्का, राहुल जगताप यांची निवडणूकीच्या रिंगणातून माघार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रवादी काँगेसचे विद्यमान आमदार राहुल जगताप यांनी वैयक्तिक अडचणींमुळे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँगेसकडून ऐनवेळी कुणाला उमेदवारी दिली जाईल याची चर्चा सध्या रंगली आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष घनशाम शेलार उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे बोलले जात असतानाच जिल्हा परिषद महिला बालकला सभापती अनुराधा नागवडे या देखील उमेदवारी अर्ज भरू शकतात अशी चर्चा आहे. मात्र आमदार राहुल जगताप यांनी अचानक माघार का घेतली याचे नेमके कारण कळू शकलेले नाही.

श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात सुरू असलेल्या राजकीय घडामोडीनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसला जोरदार धक्का बसण्याची चिन्ह आहेत. राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार राहुल जगताप यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेऊन निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली. श्रीगोंदा मतदारसंघातून पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष घन:श्‍याम शेलार यांच्या उमेदवारीची बाबत घोषणा होण्याचे संकेत आहेत.