राहुल वैद्य व दिशा परमार अडकले लग्नबंधनात

प्रसिद्ध गायक व बिग बॉस 14 चा स्पर्धक राहुल वैद्य अखेर त्याची लेडी लव्ह अभिनेत्री दिशा परमारसोबत लग्नबंधनात अडकला आहे. 16 जून रोजी दुपारी या दोघांनी पारंपारिक पद्धतीत लग्नगाठ बांधली.

राहुल वैद्य याने बिग बॉसच्या घरात असताना दिशाच्या वाढदिवशी तिला प्रपोज केले होते. त्यानंतर दिशाने घरात येऊन त्याला होकार दिला होता. घरातून बाहेर आल्यानंतर त्या दोघांच्या लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली. लग्न लागताना राहुलने गोल्डन क्रिम रंगाची शेरवानी घातली होती तर दिशाने लाल रंगाचा लेहेंगा घातलेला. लग्नाच्या ड्रेसमध्ये दोघेही फार सुंदर दिसत होते.

राहुल वैद्यचा खास मित्र व अभिनेता अली गोनी व त्याची गर्लफ्रेंड जास्मीन भसीन या लग्नाला उपस्थित होते. अली व जास्मिन दोघांनीही राहुलच्या लग्नाचे फोटो शेअर केले असून चाहत्यांनी या दोघांना लग्नासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या