दमदार पावसामुळे जांभळाचे भाव घसरले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। राहुरी

शनिवारी राञी हजेरी लावलेल्या आद्रा नक्षञातील दमदार पावसामुळे राहुरीत आज रविवारी जांभळाचे प्रतिकिलोचे बाजारभाव 30 ते 40 रूपयाने घसरले आहे.

राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोंढ्यावर आज रविवारी तब्बल चार टन जांभळाची आवक झाली. राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोंढ्यावर गेल्या चार दिवसापासुन जांभळाची आवक सुरू आहे. गुरूवारी एक नंबर जांभळाचा ठोक बाजारभाव 100 रूपये किलो पर्यंत पोहचला होता. तर दोन व तीन नंबर जांभळाला 50 ते 60 रूपये किलोचा बाजारभाव मिळाला.

शनिवारी रात्री राहुरी तालुक्यात बहुतांशी ठिकाणी आद्रा नक्षञातील पावसाने हजेरी लावल्याने आज रविवारी मोंढ्यावर एक नंबर जांभळाला 70 ते 80 रूपये किलोचा बाजारभाव मिळाला. गुरूवारच्या तुलनेत आज एक किलो जांभळाचे बाजारभाव 30 ते 40 रूपयाने घसरले आहे.

दरम्यान पावसा बरोबरच आवक वाढल्याने जांभळाच्या बाजारभावात घट झाल्याची खरेदीदार व्यापा-यांचे म्हणणे आहे.राहुरी तालुक्यातील टाकळीमिया,सडे, बारागाव नांदुर,देवळाली प्रवरा,संगमनेर तालुक्यातील झरेकाठी येथील जांभुळ विक्रीसाठी राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोंढ्यावर दाखल होत आहेत.