
आईवडील रागावले म्हणून घर सोडून गेलेल्या मुलीला नागोठणे पोलिसांनी अवघ्या सहा तासांत शोधून काढले आहे. रागाच्या भरात मुलगी पनवेलपर्यंत गेली. त्यानंतर तिने शिवडी गाठली. तिच्या शोधासाठी नागोठणे पोलिसांनी दोन पथके तैनात केली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी मुलीचा शोध घेतला आहे. शिवडीमधून मुलीला ताब्यात घेतले आणि कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. नागोठणे पोलिसांनी केलेल्या या दमदार कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
नागोठण्याच्या सुकेळी परिसरात राहणाऱ्या 15 वर्षीय मुलीने आई वडील रागावले म्हणून घर सोडले. अखेर नातेवाईकांनी नागोठणे पोलीस ठाणे गाठून मुलगी हरवल्याची तक्रार दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक आंचल दलाल, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रसाद गोकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांनी दोन पथके तैनात केली. पोलीस पथकाने सुकेळी परिसरातील सीसीटीव्ही तपासले. त्यावेळी ही मुलगी पनवेलला गेल्याचे तपासात समोर आहे. पोलिसांनी पनवेल गाठले. मुलगी ज्या ठिकाणी उतरली त्याठिकाणचे सीसीटीव्ही तपासले असता ती शिडवी दिशेने गेल्याचे निदर्शनास आले.



























































