रायगड जिल्हा परिषदेत अर्थ व बांधकाम सभापतीपदी अॅड. नीलिमा पाटील तर शिक्षण, आरोग्य सुधाकर घारेंकडे

529

रायगड जिल्हा परिषदेची विशेष सभा सोमवारी जिल्हा नियोजन विभागाच्या सभागृहात झाली. यावेळी विषय समित्यांच्या सभापतीपदाचे वाटप करण्यात आले. शेकापच्या अॅड. निलिमा पाटील यांच्याकडे अर्थ व बांधकाम विभागाची जबाबदारी तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सुधाकर घारे यांच्याकडे उपाध्यक्ष आणि शिक्षण व आरोग्य विभागाचा कार्यभार सोपविण्यात आला. बबन मुनवे यांच्याकडे कृषी व पशुसंवर्धन विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा योगिता पारधी यांच्या अध्यक्षतेखाली ही विशेष सभा पार पडली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, अतिरीक्त मुख्यकार्यकारी अधिकारी सोमवंशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश खोपकर यांच्यासह विवीध विभागांचे अधिकारी, विषय समित्यांचे नवनिर्वाचित सभापती, जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सभापती उपस्थित होते. सभेच्या सुरुवातील अभिनंदनाचे आणि दुखवट्याचे ठराव मांडण्यात आले. यानंतर निवडून आलेल्या सभापतींना विषय समित्यांचे वाटप करण्यात आले. अपेक्षेप्रमाणे शेकापने महत्वाची खाती स्वतःकडे ठेवली. निलीमा पाटील यांच्याकडे अर्थ व बांधकाम विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली. हे पद उपाध्यक्ष सुधाकर घारे यांच्याकडे जाईल अशी चर्चा होती. पण घारे यांच्याकडे शिक्षण व आरोग्य विभागाचा कार्यभार सोपविण्यात आला. बबन मुनवे यांच्याकडे कृषी व पशुसंवर्धन विभागाचा पदभार सोपविण्यात आला. समाज कल्याण विभागाच्या कार्यभार दिलीप भोईर यांच्याकडे तर महिला व बालकल्याण विभागाचा पदभार गीता जाधव यांच्याकडे असणार आहे. खातेवाटपानंतर अध्यक्षा योगिता पारधी यांनी विशेष सभा संपल्याचे जाहीर केले.

आपली प्रतिक्रिया द्या