
रेल कामगार सेना माटुंगा युनिटच्या वतीने उद्या, बुधवारी माटुंगा सेंट्रल गेट, शिव हनुमान मंदिर येथे महाशिवरात्री उत्सव साजरा करण्यात येणार आहे. सकाळी 7 वाजता सहा. कार्मिक अधिकारी गीता कृष्णन यांच्या उपस्थितीत रुद्राभिषेक तर सकाळी 10 वाजता प्रसाद वाटप आणि भजन होईल. या वेळी माटुंगा रेल्वे कारखान्याचे मुख्य कारखाना प्रबंधक विवेक आचार्य, आमदार मनोज जामसुतकर, महेश सावंत, माजी महापौर स्नेहल आंबेकर, रेल कामगार सेनेचे सरचिटणीस दिवाकर देव, कार्याध्यक्ष संजय जोशी, मुंबई मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत विनरकर, सोनाक्षी मोरे, भास्कर पल्लई, शशिकांत काळे, दिनेश खंडाळे, वैभव अत्तरदे, शिल्पा म्हात्रे उपस्थित राहणार आहेत.