रेल्वे आता 151 खाजगी ट्रेन चालविणार

947
railway-zero-accident

रेल्वेने रेल्वे गाड्यांच्या खाजगीकरणाचे आणखी एक पाऊल उचलत १०९ मार्गांवर १५१ अत्याधुनिक ट्रेन चालविण्यासाठी ‘आरएफक्यू’ निविदा मागविल्या आहेत. या ट्रेन १६ डब्यांच्या असणार असून त्यांचा वेग दरताशी १६० कि.मी. इतका असणार आहे. या प्रकल्पात रेल्वेला एकूण ३० हजार कोटीच्या गुंतवणूकीची अपेक्षा आहे.

आतापर्यंत रेल्वेने आयआरसीटीसीमार्फत ‘तेजस’ सारख्या ट्रेन चालविल्या होत्या. परंतू आता खर्‍या अर्थाने रेल्वेने खाजगीकरणाची कास धरली असून केवळ ट्रेनचा ड्रायव्हर आणि गार्ड तेवढा रेल्वेचा असणार आहे. या योजनेतील बहुतांशी ट्रेन ‘मेक इंडिया’ मोहिमेंतर्गत तयार केल्या जाणार आहेत. या प्रकल्पासाठी वित्तपुरवठा, खरेदी, ऑपरेशन्स आणि देखभाल आदी सर्व अधिकार प्रायव्हेट कंपन्यांना दिलेले असणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या