काऊंटरवर रेल्वे तिकीट बुकिंग केले असेल तर मिळणार ‘ही’ सुविधा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोविड -19 मुळे लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या उपाययोजनांच्या अनुषंगाने प्रीमियम गाड्या, मेल / एक्स्प्रेस गाड्या, पॅसेंजर गाड्या, उपनगरी गाड्या, कोलकाता मेट्रो रेल, कोकण रेल्वे इत्यादी सर्व प्रवासी रेल्वे सेवा 3 मे 2020 पर्यंत रद्दच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र रद्द झालेल्या गाड्यांचे तसेच 3 मे पर्यंतचे आरक्षण केले असल्यास त्याचा पूर्ण परतावा मिळणार आहे. ज्यांनी ऑनलाईन बुकिंग केलेले नाही त्यांना लॉकडाऊन संपल्यानंतर काउंटर वरून 31 जुलै 2020 पर्यंत परतावा मिळू शकेल.

परतावा:

रद्द केलेल्या गाड्यांच्या आरक्षणासाठी संपूर्ण परतावा मिळेल. अद्याप रद्द न झालेल्या गाड्यांच्या तिकिटांचे आगाऊ आरक्षण रद्द करणा-यांना देखील पूर्ण परतावा मिळेल.

3 मे 2020 पर्यंत रद्द करण्यात आलेल्या गाड्यांच्या ऑनलाइन तिकीटांचा परतावा रेल्वेमार्फत ग्राहकांना ऑनलाईन स्वयंचलितपणे पाठविला जाईल. ज्यांनी काउंटरवर तिकीट बुक केले आहेत ते 31 जुलै 2020 पर्यंत परतावा मिळवू शकतील.

मालवाहतूक गाड्या:

देशाच्या विविध भागात आवश्यक पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी वस्तू आणि पार्सल गाड्यांची वाहतूक कायम राहील.

तिकिटे रद्द करणे:

अनारक्षित आणि प्रवासी आरक्षण केंद्रातील सर्व तिकिट काउंटर पुढील आदेश होईपर्यंत बुकिंगसाठी निलंबित (बंद) राहतील. पुढील आदेशांपर्यंत ई-तिकिटांसह गाड्यांच्या तिकिटांचे आगाऊ आरक्षण होणार नाही. तथापि, ऑनलाइन रद्द करण्याची सुविधा कार्यरत राहील. पुढील आदेश येईपर्यंत 3 मे नंतरच्या ई तिकिटांसह कोणत्याही प्रकारची बुकिंग केली जाणार नाही.