
‘यू टय़ूब’वर प्रशिक्षण घेऊन ‘कॉमडॉम’ नावाच्या एक्सटेन्शन सॉफ्टवेअरद्वारे आपल्या मोबाईलमधून ‘तत्काळ’ तिकिटे बुक करून घोटाळा करीत शंभर ते दोनशे रुपयांच्या कमिशनवर तिकिटांची विक्री करणाऱया एका दलालास रेल्वे सुरक्षा बलाने कळंबोलीच्या सेक्टर नं. 1 मधील त्याच्या घरावर धाड टाकून अटक केली आहे.
पनवेल आरपीएफच्या सहायक सुरक्षा आयुक्तांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे उपनिरीक्षक जी.एस.अडले, हेड कॉन्स्टेबल मुकेश दुधाने आणि कॉन्स्टेबल रवींद्र खडसे यांनी कळंबोलीत गुरुवारी धाड टापून आरोपी राज मोहम्मद नसीम खान (18) याला अटक केली. तो आपल्या दोन पर्सनल युजर आयडीमार्फत मोबाईलमधून ‘तत्काळ’ ई-तिकिटांचे आरक्षण करायचा. त्याने यू टय़ूबवर याचे प्रशिक्षण घेतल्याचे सांगितले असून कॉमडॉम नावाच्या एक्सटेंन्शन सॉफ्टवेअरद्वारे तो एकावेळी दहा रेल्वे तिकिटांचे बुपिंग करायचा. ही तिकिटे शंभर ते दोनशे रुपयांच्या कमिशनवर विकायचा अशी माहिती उघडकीस आली असून कळंबोली आरपीएफ पोलीस पुढील तपास करीत आहेत.
दुसऱया एका घटनेत माझगाव येथे सीएसएमटीच्या दक्षता पथकाचे के.डी.मोरे, एटीएस टीम व आरपीएफ स्टाफने शमीम शेख (49) या दलालास अटक केली. आयआरसीटीसीच्या अधिपृत आयडीच्या आड स्वतः पर्सनल युजर आयडी वापरून तो तिकिटांचा घोटाळा करायचा.
त्याच्याकडून प्रवास सुरू होणारी 22,320 रुपयांची, प्रवास संपलेली 26,018 रु. आणि रद्द झालेली 14,207 रुपयांची तिकिटे जप्त करण्यात आली आहेत. तसेच वाशी येथून शेखर नाईक (47) या 200 ते 300 रुपयांच्या मोबदल्यात रेल्वे तिकीटे विकणाऱया दलालास मानखुर्दच्या आरपीएफ स्टाफने शुक्रवारी जेरबंद केले असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या सूत्रांनी दिली आहे.



























































