रेल्वेची चौथी ऑक्सिजन एक्सप्रेस आज महाराष्ट्रात पोहचणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रेल्वेने रो रो ‘ऑक्सिजन एक्सप्रेस’ सेवेद्वारे लिक्विड मेडिकल ऑक्सिजन देशभरात पुरविण्याचे सत्र सुरूच ठेवले असून रविवारी रात्री 2.25 वाजता नागपुरात पोहचत आहे. महाराष्ट्राला मिळालेली ही चौथी ‘ऑक्सिजन एक्सप्रेस’ असून ओडिशाच्या अंगुल येथून चार टँकरद्वारे 60 टन ऑक्सिजन येथे पोहचत आहे. आतापर्यंत महाराष्ट्राला तीन ऑक्सिजन एक्सप्रेस मिळाल्या आहेत. पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस विशाखापट्टणम ते नागपूर (तीन टँकर), दुसरी विशाखापट्टणम ते नाशिक (चार टँकर), तिसरी हापा ते कळंबोली (तीन टँकर) आणि चौथी (रविवारी रात्री पोहचत आहे) अंगुल ते नागपूर (चार टँकर) अशा चार ऑक्सिजन एक्सप्रेस आहेत. आतापर्यंत 290 मे. टनहून अधिक ऑक्सिजन महाराष्ट्राला मिळाला असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.