
रेल्वे मंत्रालयाने जम्मू-कश्मीरमधील प्रस्तावित तीन प्रकल्पांना स्थगिती दिली आहे. रेल्वेने डिसेंबर 2023 मध्ये कश्मीरमध्ये तीन नवीन मार्गांच्या सर्वेक्षणाला मंजुरी दिली होती. यामध्ये सोपोर-पुपवाडा (33.7 किमी), अवंतीपोरा-शोपियान (27.6 किमी) आणि अनंतनाग-बिजबेहारा-पहलगाम (77.5 किमी) या तीन प्रकल्पांचा समावेश आहे. प्रस्तावित तिन्ही मार्ग खोऱयातील प्रमुख बागायती जिह्यांमधून जाणार होते. यात शोपियान, पुलवामा, अनंतनाग यांचा समावेश आहे. या प्रकल्पाला शेतकऱयांनी विरोध सुरू केला आहे. हे प्रकल्प झाल्यास 7 लाखांहून अधिक सफरचंदाची झाडे तोडावी लागणार आहेत, यामुळे विरोध होत आहे.


























































