दिवाळीच्या खरेदीवर पावसाचे सावट, पुढील पाच दिवस संपूर्ण महाराष्ट्रात पावसाची शक्यता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवस वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ होण्याची शक्यता असून, हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तसेच वादळादरम्यान ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने जोरदार वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे आणि वादळी वातावरणात सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. हवामान खात्याने याबाबत माहिती दिली आहे.

इतर जिल्ह्यात महाराष्ट्रात कोसळणार हलक्या सरी

मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात मुसळधार वादळी पावसाचा इशारा देण्यात आला असला तरी त्यासह इतर जिल्ह्यांमध्ये देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अर्णबनंतर पश्चिम बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या आणखी एका वादळामुळे सध्या पावसाळी परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र याचा फटका दिवाळीनिमित्त खरेदी व विक्री करणाऱ्यांना बसणार आहे.