राजभवनातील 16 कर्मचाऱ्यांना कोरोना, स्टाफ क्वार्टर्स प्रतिबंधित क्षेत्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्राच्या राज्यपालांचे निवासस्थान असलेल्या वाळकेश्वर येथील राजभवनातील 16 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. कर्मचारी पॉझिटिव्ह निघालाच्या पार्श्वभूमीवर संबंधित परिसरात पालिकेने सॅनिटायझेशन केले असून स्टाफ क्वॉर्टर्स प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे.

राज्यपालांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह, प्रकृती ठणठणीत!

आपल्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असून प्रकृतीही ठणठणीत असल्याचे खुद्द राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्पष्ट केले आहे. आपल्याला कोरोनाची कोणतीही लक्षणेही नाहीत. शिवाय आपण क्वारंटाइन नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.