पोलिसांना सहकार्य करत नसल्यानेच कुंद्राला अटक!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पॉर्न फिल्मची निर्मिती आणि मोबाईल अॅपद्वारे त्याचे प्रसारण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला व्यावसायिक राज कुंद्रा तपासात पोलिसांना सहकार्य करत नसल्याने त्याला अटक करण्यात आली आहे. त्यामुळे त्याची अटक बेकायदेशीर असल्याचा दावा राज कुंद्रा यांच्या वकिलांनी आज मुंबई उच्च न्यायालयात केला. दरम्यान, कुंद्रा याच्या अर्जावर तूर्तास कोणतेही आदेश देण्याची आवश्यकता नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केल्याने कुंद्राला शनिवारपर्यंत तुरुंगातच राहावे लागणार आहे

पॉर्न फिल्मप्रकरणी राज कुंद्रा (45) याला मुंबई पोलिसांनी 19 जुलै रोजी अटक केली असून मॅजिस्ट्रेट कोर्टाने पोलीस कोठडीची शिक्षा सुनावली आहे. मात्र सीआरपीसी कायद्याच्या कलम 41 (अ) नुसार पोलिसांनी अटक करण्यापूर्वी आपल्याला नोटीस बजावणे गरजेचे होते, पण नोटीस न पाठवताच अटक केल्याचा दावा करत कुंद्रा याने मुंबई उच्च न्यायालयात ज्येष्ठ वकील आबाद पोंडा यांच्या मार्फत याचिका दाखल केली आहे.