
राजकारणात पूर्वी विरोध व्हायचा तर तो आमने सामने व्हायचा. आमचे आमदार राजू पाटील यांना मला विचारायचं आहे की पक्ष घेता काय हातात? एकदा हातात घेऊन बघा, मग आमचं काय जळतं ते कळेल तुम्हाला. आम्ही दिवस-रात्र बर्नेल लावत असतो, असे भाष्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज व्यक्त केले.
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाच नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाच्या हवाली केलं आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर राजकीय क्षेत्रात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मनसेच्या एकमेव आमदाराने उद्या पक्ष आणि रेल्वे इंजिनावर दावा केला तर निवडणूक आयोग त्याच्या हवाली मनसे पक्ष करणार का? असा सवाल केला होता. राज ठाकरे यांनीही पक्ष एकदा हातात घेऊन बघा, मग कळेल आमचं काय जळत ते, असे परखड भाष्य केले आहे.































































