फॉक्सकॉन गुजरातला जाणे हे राज्य सरकारचे अपयश, राज ठाकरे यांची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला जाणे हे राज्य सरकारचे अपयश असल्याची टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. या प्रकरणाच्या चौकशीची मागणीही त्यांनी केली. येणाऱ्या उद्योगांवर आपले लक्ष नसेल तर आपल्याकडे कोण आणि का येईल. आपण महाराष्ट्रातून उद्योग घालवतोय यापेक्षा दुसरे दुर्दैवी काहीही नाही, असेही ते म्हणाले.

वेगळय़ा विदर्भाच्या मुद्दय़ावर जनमत चाचणी व्हायला हवी. लोकांना वेगळा विदर्भ हवा की नको यावर मतदान करू द्या, असे सांगून राज ठाकरे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांतील बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीलाही विरोध केला. एका प्रभागात चार-चार नगरसेवक असतील तर लोकांना आपला नगरसेवक कोण हे कसे समजणार. लोकशाहीकरिता ही पद्धत घातक असल्याचे ते म्हणाले.

ओल्या दुष्काळाबाबत ‘मामा’ना विचारा

आपण ओल्या दुष्काळाची मागणी सरकारकडे करणार का असे पत्रकारांनी विचारले असता राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता, याबाबत तुम्ही ‘मामा’नाच विचारा, अशी खोचक टीका केली.