राज ठाकरे आज ईडीसमोर

979

कोहिनूर मिल खरेदीप्रकरणी सक्तकसुली संचालनालयाने (ईडी) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना नोटीस बजावली आाहे. यासंदर्भात ते 22 ऑगस्ट रोजी ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार आहेत. दादर येथील कोहिनूर मिल नं. 3 चारशे एकवीस कोटींना खरेदी करून तेथे ‘कोहिनूर स्क्वेअर’ विकसित करण्यासाठी ‘कोहिनूर सीटीएनएल इफ्रास्ट्रक्चर’ ही कंपनी स्थापन करण्यात आली होती.

‘आयएल ऍण्ड एफएस’कडून कोहिनूर सीटीएनएल कंपनीने घेतलेल्या कर्ज प्रकरणात राज ठाकरे यांच्या सहभागाबाबत ईडीकडून तपास करण्यात येत आहे. यासाठी त्यांना ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सरकारी क्षेत्रातील कंपनी इफ्रास्ट्रक्चर लीजिंग ऍण्ड फायनान्शियल सर्व्हिसेसद्वारे (आयएलएफएस) मुंबईच्या कोहिनूर सीटीएनएल कंपनीला 860 कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. त्यानंतर आयएलएफएसला मोठे नुकसान झाले होते. त्या प्रकरणाचा ईडीने तपास सुरू केला आहे. दरम्यान, ईडी कार्यालयाबाहेर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना कलम 149 नुसार नोटिसा बजावल्या आहेत.

उद्धव ठाकरे म्हणाले…ईडीच्या चौकशीतून काही निष्पन्न होणार नाही
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने नोटीस बजावली असल्याबाबत आज पत्रकारांनी विचारले असता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, ईडीच्या चौकशीतून काही निघेल असं मला वाटत नाही. थोडं थांबूयात, एक-दोन दिवसांत ते स्पष्ट होईल.

आपली प्रतिक्रिया द्या