
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज 66 वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘मातोश्री’ निवासस्थानी येऊन उद्धव ठाकरे यांचे अभीष्टचिंतन केले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राजसाहेब ठाकरे ह्यांनी पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. pic.twitter.com/1pxJSU5Sf7
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) July 27, 2026
देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव
उद्धव ठाकरे यांच्यावर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. देशभरातील मान्यवरांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त एक्स पोस्टच्या माध्यमातून तसेच फोन करून शुभेच्छा दिल्या. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.

























































