“आम्ही लहान असताना आई-वडील सांगायचे, रात्री झोपताना डोक्याला तेल लावत जा, बुद्धी तल्लख होते. एका माणसाने आयुष्यभर तेल चोपड चोपड चोपडले, पण बुद्धी आली नाही. प्रत्येक केस स्वतंत्र उमेदवारासारखा उभा असतो आणि हे म्हणे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री. आपण काय बोलतोय, जग कुठे चाललेय… उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील दगडावरील फ्रिंगरप्रिट आधारशी लिंक करणार आहेत. कसे? मला चंद्रकांत पाटील यांच्या मेदूवरील फिंगरप्रिंट बघायचेत. कोल्हापूरकरांनी ज्ञान मिळावे म्हणून या माणसाला शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्याला पाठवले, तिथेही काही झाले नाही. आता असे शिक्षणमंत्री म्हटल्यावर जेन झींचा पारा चढणारच. ही अशी माणसं आमच्या नशिबी आणून ठेवली आहेत”, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली.




























































