
6 डिसेंबर 1992 रोजी अयोध्येतील बाबरी मशिद पाडली गेली, पण त्याच्याआधी दोन दिवस हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेनेचे तत्कालीन नेते व माजी खासदार सतीश प्रधान यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यात अयोध्येत आलेले शिवसैनिक फक्त प्रतीकात्मक कारसेवा न करता शिवसेनेच्या स्टाईलने कारसेवा करणार असे जाहीर केले. त्यानंतर असंख्य शिवसैनिक व कारसेवकांनी वादग्रस्त बाबरी मशिद उद्ध्वस्त केली. या ऐतिहासिक घटनेला आज शिवसेना नेते व खासदार राजन विचारे यांनी उजाळा दिला.
अयोध्येच्या लढय़ामध्ये मोलाचे योगदान देणारे सतीश प्रधान यांच्या निवासस्थानी जाऊन आज ठाण्यातील शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पदाधिकाऱयांनी त्यांचा सत्कार केला. यानिमित्ताने खासदार राजन विचारे यांनी बाबरी नेमकी शिवसैनिकांनी कशी उद्ध्वस्त केली व पडद्यामागे कशा घडामोडी घडल्या होत्या याची माहिती दिली. ते म्हणाले की, राम मंदिर आंदोलनाच्या काळात सतीश प्रधान हे उत्तर प्रदेशचे संपर्कप्रमुख होते. त्यांच्यासमवेत शिवसेनेचे असंख्य पदाधिकारी व शिवसैनिक गेले होते.
उपजिल्हाप्रमुख कृष्णकुमार कोळी, शहरप्रमुख प्रदीप शिंदे, उपशहरप्रमुख संतोष शिर्के, माजी नगरसेकक संजय दळकी, किभागप्रमुख स्कप्नील शिरकर, प्रदीप शेडगे, शाखाप्रमुख अमोल हिंगे, समन्वयक प्रदीप काघ, ठाण्याचे संपर्कप्रमुख सुभाष म्हसकर, महिला शहर संघटक प्रमिला भांगे, महिला शहर संघटक मंजिरी ढमाले आदी उपस्थित होते.
























































