
शिवसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देत पोलिसांकडून त्यांची छळवणूक करणार्या मिंधे गटाच्या शकुनी कारवायांचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार राजन विचारे यांनी आज खणखणीत समाचार घेतला. शिंदे, म्हस्के हे दडपशाहीचे धंदे बंद करा. हिंमत असेल तर राजीनामे द्या आणि निवडणुका घ्या. कोणाची किती ताकद आहे ते तुम्हाला दिसेल. ज्या पक्षाने तुम्हाला मोठे केले त्या पक्षाची बदनामी करायला तुम्हाला लाज वाटत नाही काय? असा घणाघात राजन विचारे यांनी एकनाथ शिंदे आणि नरेश म्हस्के यांच्यावर केला.




























































