आता पाकिस्तानशी चर्चा फक्त ‘पीओके’वरच!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू-कश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 हटविल्यानंतर संतापाने तणतणणाऱया पाकिस्तानला हिंदुस्थानचे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी चांगलेच झापले. पाकिस्तानशी आता कोणत्याही विषयावर चर्चा होणार नाही, चर्चा होईल ती केवळ ‘पीओके’वरच अशा शब्दांत त्यांनी पाकडय़ांना बजावले. ते हरयाणामधील कालका येथील एका सभेत बोलत होते.

दोन्ही देशांमध्ये चर्चा व्हावी असे पाकिस्तानचे म्हणणे आहे, पण कोणत्या मुद्दय़ावर चर्चा पाहिजे? का पाहिजे? पाकिस्तानने त्यांच्या भूमीवरून होणारा दहशतवाद थांबवला तरच चर्चा केली जाईल.