राजापूरात गंगा आली, लॉकडाऊन मुळे दर्शन,स्नान नाही!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजापूर तालुक्यातील उन्हाळे येथे आज बुधवारी गंगामाईचे सकाळी 6 वा च्या सुमारास आगमन झाले. चौदा कुंडासह काशीकुंड आणि मूळ गंगा या ठिकाणी गंगामाई चांगल्या प्रकारे प्रवाहीत आहे. तब्बल 295 दिवसांनी गंगेचे आगमन झाले. लॉकडाऊनमुळे भाविकांना गंगामाईचे दर्शन घेता येणार नाही.सर्व धार्मिक स्थळे बंद असल्यामुळे उन्हाळे तीर्थक्षेत्रीही भाविकांना जाता येणार नाही.

गंगामाईचे गतवर्षी 25 एप्रिलला आगमन झाले होते. त्यावेळी साठ दिवसांचे वास्तव्य केल्यानंतर 24 जून रोजी निर्गमन झाले होते. त्यानंतर तब्बल 295 दिवसांनी पुन्हा एकदा गंगामाईचे तीर्थक्षेत्री आगमन झाले आहे. उन्हाळे येथील काही ग्रामस्थांच्या सकाळी गंगामाईचे आगमन झाल्याचे निदर्शनास आले. आज सकाळी नेमके किती वाजता गंगामाईचे आगमन झाले याबाबत निश्चित माहिती नसली तरी, सकाळी 6 वा. च्या सुमारास गंगामाईचे आगमन झाल्याचा माहिती गंगा देवस्थानचे श्रीकांत घुगरे यांनी दिली. गंगामाईचे आगमन झाल्यानंतर गंगामाई चांगली प्रवाहीत असून सर्व कुंडांमध्ये पाण्याचे प्रमाण चांगले आहे. गायमुखही सध्या प्रवाहीत आहे.