
राजस्थानच्या धौलपूर जिह्यातील सैपऊ विभागाच्या जुन्या बाजारात एका जुन्या हवेलीत खोदकाम करताना एका पितळेच्या कलशात चांदीची नाणी सापडली आहेत. ही चांदीची नाणी ब्रिटीश काळातील असून त्याकर एडवर्ड सातव्या राजा एम्परर असे लिहिलेले आहे. प्रशासनाने ही नाणी ताब्यात घेतली आहेत.
व्यापारी कृष्णा सेठ जुनी हवेली तोडून नवीन बांधकाम करत आहेत. हवेलीच्या परिसरात काही मजूर खोदकाम करत असताना एका मजुराची कुदळ कलशाकर आपटली. जेव्हा त्याने माती बाजूला वरून पाहिली तर त्याला कलश दिसला. त्यात साधारण 100 वर्षे जुनी चांदीची नाणी होती. ज्या मजुराला नाणी सापडली तो पितळेचा कलश घेऊन तिथून पळाला आणि त्याच्या मागे इतरही मजूर पळू लागले. मजुराने कलशातील काही चांदीची नाणी अन्य मजुरांच्या अंगावर फेकली. लोकांनी ती लुटली. या घटनेची माहिती मिळताच प्रशासन आणि पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी चांदीची 140 नाणी ताब्यात घेऊन सरकारी खजिन्यात ठेवली आहेत. हवेलीच्या जागी आणखी नाणी मिळण्याची शक्यता आहे.






















































