
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. यापूर्वी अशोक गहलोत यांची पत्नी सुनीता गहलोत यांना देखील कोरोनाचा संसर्ग झाला आहे. दोघेही घरात क्वारंटाइन झाले आहेत. याबाबत गहलोत यांनी ट्विट करून माहिती दिली आहे.
अशोक गहलोत ट्विट करून म्हणाले आहेत की, ‘माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्यात कोणतेही लक्षण नसून मी ठीक आहे. कोविड प्रोटोकॉलचे पालन करत मी क्वारंटाइन राहूनच काम करत आहे.’
कोविड टेस्ट करवाने पर आज मेरी रिपोर्ट भी पॉजिटिव आई है। मुझे किसी तरह के लक्षण नहीं हैं और मैं ठीक महसूस कर रहा हूं। कोविड प्रोटोकॉल का पालन करते हुए मैं आइसोलेशन में रहकर ही कार्य जारी रखूंगा।
— Ashok Gehlot (@ashokgehlot51) April 29, 2021
याआधी त्यांनी त्यांच्या पत्नीला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती ट्विट करून दिली होती. त्यांनी ट्विटमध्ये सांगितलं होत की, माझी पत्नी सुनीता गहलोत कोविड पॉझिटिव्ह आढळली आहे. त्यांना घरीच क्वारंटाइन करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत.





























































