राजस्थानात बसचा भीषण अपघात, 14 जण ठार तर 25 जखमी

619

राजस्थानच्या बीकानेर येथे बस आणि ट्रकची जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. सोमवारी सकाळी झालेल्या या अपघातात तब्बल 14 जण ठार झाले आहेत. तर 25 जण जखमी झाले आहेत.

ही बस बीकानेरहून जयपूरला जात होती. वाटेत डुंगरगढ येथे वेगाने येणाऱ्या ट्रकने बसला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भयंकर होती, की बसच्या पुढील भागाच्या ठिकऱ्या उडाल्या. ट्रक आदळल्यानंतर दोन्ही वाहनांनी अचानक पेट घेतला. या अपघातात 10 जण जागीच मरण पावले तर उर्वरित चार जणांनी रुग्णालयात उपचारांदरम्यान अखेरचा श्वास घेतला. बचाव पथकांनी आगीवर नियंत्रण मिळवलं आणि प्रवाशांना बाहेर काढलं.

जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सकाळची वेळ असल्याने बहुतांश प्रवासी झोपेत होते. त्यामुळे त्यांना लवकर बसच्या बाहेर पडता आलं नाही. त्यामुळेही अनेक जण होरपळले. या आगीमुळे मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या