पडदा पद्धत असेपर्यंत महिलांचा विकास अशक्य, राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांचे मत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
ashok-gehlot

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पडदा पद्धतीवर टीका केली आहे. जो पर्यंत महिलांना पडद्याआड असतील तोपर्यंत महिलांचा विकास शक्य नाही असे गेहलोत म्हणाले. गेहलोत यांनी बालविवाहवरही जोरदार टीका केली.

जयपूरच्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री गेहलोत म्हणाले की “पडद्याआड महिलांना डांबण्यास एका समाजाला अधिकार आहे का? जोपर्यंत ही पडदापद्धत समाजात आहे तोपर्यंत महिला पुढे जाऊ शकत नाही.” पडदा पध्दतीचा काळ गेला असेही गेहलोत म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी बालविवाहावरही टीका केली. बालविवाहामुळे लहान मुलांचे आयुष्य नष्ट होते. कुठल्याही मुलीचे बालविवाह होता कामा नये असे निर्देश त्यांनी उपस्थित अधिकार्‍यांना दिले.