
बॉलीवूडचा अभिनेता राजकुमार राव दरवर्षी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करतो. यंदाही त्याचा बाप्पा असा पर्यावरणाचा संदेश देईल. याबद्दल राजकुमार म्हणाला, मी दरवर्षी स्वतःच्या हाताने गव्हाच्या पिठाने गणपतीची मूर्ती बनवतो. खूप मजा येते. डोळ्यांसाठी राजमाचा वापर करतो. मसूर आणि इतर डाळी वापरून दागिने बनवतो. शेवटी मी त्यांना हळदीचा वापर करून रंग देतो आणि हे करण्यात एक वेगळे सुख आहे. राजकुमार बायोडिग्रेडेबल मटेरियल आणि नैसर्गिक रंग वापरून अनोख्या पद्धतीने हा उत्सव पर्यावरणपूरक साजरा करतो.






























































