ब्रह्मास्त्र आणायला राजनाथ गेले रशियाला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे तीन दिवसांच्या रशियाच्या दौऱयावर रवाना झाले आहेत. लडाख सीमेवर चीनबरोबर वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षणमंत्र्यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण आहे. संरक्षणाच्या दृष्टीने ‘ब्रम्हास्त्र’ समजले जाणाऱया एस-400 मिसाईल सिस्टीमची मागणी संरक्षणमंत्री रशियाकडे करणार आहेत. जमिनीवरून हवेत मारा करणारी एस-400 क्षेपणास्त्र प्रणाली हे जगातील अत्यंत धोकादायक हत्यार म्हणून ओळखले जाते.