राजस्थानमध्ये वडिलांकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार, मुलाने उचलले धक्कादायक पाऊल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजस्थानमध्ये एका नराधम बापाने आपल्या सख्ख्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला आहे. ही बाब जेव्हा मुलाला कळाली तेव्हा त्याने धक्कादायक पाऊल उचलले आहे.

राजस्थानच्या जालोर जिल्ह्यात एक कुटुंब राहत होते. कुटुंबात आई वडील भाऊ बहीण असे चौघेजण होते. एकदा बापाने मोबाईल देण्याच्या बहाण्याने मुलीला गाडीत नेले आणि अत्याचार केला. त्यामुळे मुलगी खूप घाबरली होती.

पीडित मुलीने आपल्या आईला याबाबत सांगितले. परंतु आईने वडिलांच्या या अत्याचाराकडे कानाडोळा करत उलट मुलीलाच दरडावले आणि याबाबत कुठेही वाच्यता न करण्यासाठी धमकावले.

नंतर पीडित मुलीने आपल्या मावशीला फोन केला आणि आपल्यावर अत्याचार झाल्याचे सांगितले. तेव्हा मुलीच्या भावाने हे ऐकले आणि खूप दुःखी झाला. दुःखी झालेल्या भावाने नदीत उडी मारू जीव दिला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी वडील फरार झाला आहे. तसेच मुलीची चौकशी सुरू असून याबाबत तपास सुरू आहे.